महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

छत्तीसगड ; कोरोनाचा सामना करण्यासाठी तरुणांनी तयार केले सॅनिटायझर स्प्रेयर - safety precaution for corona

कोंडागावमधील काही युवकांनीही कोरोनाचा सामना करण्यासाठी एक युक्ती शोधून काढली आहे. यामध्ये लग्नसमारंभामध्ये पाहुण्यांसाठी सुंगधित इत्राचा शिडकाव करणाऱ्या पंख्याचा यात वापर करण्यात आला असून याद्वारे ये-जा करणाऱ्या नागरिकांवर सॅनिटायझरचा शिडकाव करण्यात येईल.

कोंडागावच्या तरुणांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी तयार केले सॅनिटायझर स्प्रेयर
कोंडागावच्या तरुणांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी तयार केले सॅनिटायझर स्प्रेयर

By

Published : Apr 13, 2020, 11:43 AM IST

कोंडागाव - कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी छत्तीसगडच्या कोंडागावमधील रुग्णालय वार्डातील काही युवकांनी एक योजना तयार केली आहे. या युवकांनी काही शक्कल वापरुन एक सॅनिटायझर स्प्रेयर तयार केले आहे. हा सॅनिटायझर आता मार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना सॅनिटाईझ करणार आहे.

कोंडागावच्या तरुणांनी तयार केले सॅनिटायझर स्प्रेयर

कोरोना विषाणू मांडलेल्या उच्छादामुळे जगभरावर संकट ओढावले आहे. या परिस्थितमध्ये प्रत्येकजण स्वत:ला आणि त्याच्या जवळपासच्या लोकांना वाचवण्याच्या आटोकात प्रयत्नात दिसत आहे. कोंडागाव मधील काही युवकांनीही कोरोनाचा सामना करण्यासाठी एक युक्ती शोधून काढली आहे. यामध्ये लग्नसमारंभामध्ये पाहुण्यांसाठी सुंगधित इत्राचा शिडकाव करणाऱ्या पंख्याचा यात वापर करण्यात आला आहे.

या तरुणांनी यासाठी एका ड्रममध्ये सॅनिटायझर टाकून त्यावर फॅन अ‌ॅडजस्ट करण्यात आला आहे. जेणेकरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांवर या पंख्यामार्फत सॅनिटायझरचा शिडकाव होईल. त्यांच्या या कल्पनेमुळे नागरिकांना निर्जंतुकीकरणासाठी सहकार्य मिळेल. या तरुणांच्या कार्याचे सध्या परिसरात कौतुक केले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details