तुमकूर(कर्नाटक) -कोर्तागरे तालुक्यात एका पंचवीस वर्षीय तरूणाने टिकटॉक व्हिडिओ बनवून आत्महत्या केली. टिकटॉक व्हिडिओ बनवल्यानंतर या तरूणाने किटकनाशकाचे सेवन केले.
धक्कादायक.. टिकटॉक व्हिडिओ बनवून तरुणाने केली आत्महत्या - कर्नाटक आत्महत्या टिकटॉक व्हिडिओ
तरुणांवर दिवसेंदिवस टिकटॉकचा प्रभाव पडत असल्याचे दिसत आहे. कर्नाटकच्या कोर्तागरे तालुक्यात एका पंचवीस वर्षीय तरुणाने टिकटॉक व्हिडिओ बनवून आत्महत्या केली. धनंजय असे या तरूणाचे नाव आहे.
मृत धनंजय
धनंजय असे या तरुणाचे नाव आहे. शेतामध्ये किटकनाशकाचे सेवन केल्यानंतर त्याला कोर्तागरे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.'मला एकदा मरायचे आहे. मृत्यूला सामोरे जाताना कशी स्थिती असते हे मला अनुभवायचे आहे. त्यामुळे मी मरण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही हे बघितले पाहिजे', असे धनंजय या व्हिडिओमध्ये म्हणत आहे.