महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उत्तराखंडमध्ये क्वारंटाई सेंटरमध्येच तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या - hanging fan in Quarantine Center

उत्तराखंडमध्ये क्वारंटाईन सेंटरमध्ये एका तरुणाने पंख्याला गळफास घेऊन जीवन संपवले.

hanging fan in Quarantine Cente
उत्तराखंडमध्ये एका तरुणाने क्वारंटाई सेंटरमध्ये घेतला गळफास

By

Published : Apr 7, 2020, 10:31 AM IST

रुद्रपूर (उत्तराखंड) - गेल्या 7 दिवसांपासून क्वारंटाईन सेंटरमध्ये राहत असलेल्या एका तरुणाने पंख्याला लटकून आत्महत्या केली. हा घटनेमुळे जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. खटीमा पोलिसांनी या तरुणाला 30 मार्चला क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवले होते.

युआयआरडीच्या एका गेस्ट हाऊसमध्ये बनविण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये पीलीभीतच्या पूरनपूर येथील युवकाला क्वारंटाइन केले होते. आज सकाळी सेंटरचा कर्मचारी युवकाला जेवण देण्यासाठी गेला असता ही घटना उघडकीस आली. घटनास्थळी आलेल्या डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केले. जिल्हा प्रशासनाने या घटनेची माहिती मृत तरुणाच्या कुटुंबीयांना कळवली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details