महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उन्नावमध्ये युवकाला अमानूष मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू

शनिवारी पहाटे उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यातील एका युवकाचा पोलिसांनी त्याच्या निवासस्थानापासून दूर नेल्यानंतर रुग्णालयात मृत्यू झाला. मृताचे त्याच्या परिसरातील मुलीशी प्रेमसंबंध असल्याचे समजले आहे. पुढील चौकशी सुरू आहे.

उन्नावमध्ये युवकाला अमानुष मारहाण
उन्नावमध्ये युवकाला अमानुष मारहाण

By

Published : Oct 3, 2020, 4:31 PM IST

उन्नाव - जिल्ह्यातील पिपर खेरा गावात शुक्रवार आणि शनिवारदरम्यानच्या मध्यरात्री जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. 'गावातून आलेल्या फोनवरून तेथे एक चोर आल्याची माहिती आम्हाला मिळाली. पोलीस कर्मचारी तेथे पोहोचले असता, त्यांना गंभीर जखमी अवस्थेतील एक तरुण आढळला. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथेच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला,' असे पोलिसांनी सांगितले.

उन्नावमध्ये युवकाला अमानुष मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू

'विजयचे गेल्या चार वर्षांपासून त्याच्या परिसरातील एका मुलीशी प्रेमसंबंध असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ही घटना या प्रकरणाशी संबंधित असू शकते,' असे उन्नाव सिटीचे सर्कल अधिकारी गौरव त्रिपाठी ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले. पुढील तपास चालू आहे. मात्र, अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे ते म्हणाले.

हेही वाचा -'जगातील कोणतीही ताकद मला रोखू शकत नाही', राहुल गांधी हाथरसला रवाना

मात्र, रात्रीच्या या घटनेबाबतचा पोलिसांनी सांगितलेला तपशील मृत विजयच्या भावाने नाकारला आहे. 'पोलिसांनी शेतात काम करण्यासाठी गेलेल्या विजयच्या कुटुंबाला काहीही न सांगता रात्री तीनच्या सुमारास त्याला जबरदस्तीने ताब्यात घेतले,' असे त्याच्या भावाने म्हटले आहे.

'पोलीस त्याला एका गाडीत बसून नेत असल्याचे आम्ही पाहिले होते. ते विजयला जबरदस्तीने घेऊन जात असल्याचे आम्ही पाहिले. त्यांनीही त्या वेळी आमच्याकडे पाहिले. ते त्याला का आणि कोठे घेऊन जात आहेत, याबद्दल त्यांनी आमच्या कुटुंबाला काहीही सांगितले नाही,' असे मृताच्या भावाने म्हटले आहे. नंतर, त्याचा रुग्णालयात मृत्यू झाल्याची बातमी आम्हाला मिळाली, असे त्याने पुढे सांगितले. तसेच, आपल्या भावाचे प्रेमसंबंध असल्याच्या वृत्तालाही त्याने दुजोरा दिला.

हेही वाचा -'आपण रामराज्याचा दावा केला; मात्र हाथरस प्रकरणाने भाजपाची प्रतिमा मलिन'

ABOUT THE AUTHOR

...view details