महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उमेदवारी अर्ज भरताना राजू शेट्टी सोबत योगेंद्र यादव; काय आहे संबंध? - Kolhapur Parliamentry Constituency

राजू शेट्टी यांच्या सोबत उमेदवारी अर्ज दाखल करताना योगेंद्र यादव उपस्थित होते. त्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले. आपण यादव यांना नेहमी टीव्हीवर राजकीय विश्लेषण करताना पाहत असतो. मात्र, आज अचानक योगेंद्र यावद कोल्हापूरात कसे? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता.

राजु शेट्टी सोबत योगेंद्र यादव

By

Published : Mar 29, 2019, 12:38 PM IST

Updated : Mar 29, 2019, 2:33 PM IST

कोल्हापूर -लोकसभा निवडणुकांना फारच कमी कालावधी उरलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध पक्षाचे नेते उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. कोल्हापूरमध्ये तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. गुरूवारपासूनच नामांकनासाठी नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात गर्दी केली होती. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटेचे नेते राजू शेट्टी यांनी समर्थकांच्या मोठ्या गर्दीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या या शक्तीप्रदर्शनात राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव उपस्थित असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

राजू शेट्टी यांच्या सोबत उमेदवारी अर्ज दाखल करताना योगेंद्र यादव उपस्थित होते. त्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले. आपण यादव यांना नेहमी टीव्हीवर राजकीय विश्लेषण करताना पाहत असतो. मात्र, आज अचानक योगेंद्र यावद कोल्हापूरात कसे? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. दोघांची मैत्री ही आत्ताची नाही. ते तब्बल ६ वर्षांपासून एकमेकांसोबत काम करत आहेत.

राजू शेट्टी आणि योगेंद्र यादव यांची भेट दिल्ली येथे अण्णा आंदोलनाच्या वेळी झाली. दोघांचेही विचार शेतकऱ्यांच्या हिताचे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी दोघेही धाऊन जाणारे. दोघांचेही विचार एकच असल्यामुळे त्यांच्या भेटीचे रुपांतर घट्ट मैत्रीमध्ये झाले. तेव्हापासून दोघेही एकमेकांच्या आंदोलनात आवर्जून उपस्थित राहतात.

योगेंद्र यादव त्यावेळी आम आदमी पक्षासाठी काम करत होते. मात्र, २०१५मध्ये त्यांनी आपला रामराम ठोकला. त्यांनतर ज्येष्ठ वकिल प्रशांत भूषण यांच्यासोबत मिळून त्यांनी शेतकऱ्यांसाठी नव्या पक्षाची स्थापना करण्याचा विचार केला. तेथूनच स्वराज्य अभियान या पक्षाची स्थापना झाली. पक्ष स्थापनेपासून अनेक वेळा योगेंद्र यादव यांनी राजू शेट्टींची भेट घेतली आहे. शेतकऱ्यांसाठी कोणती धोरणे राबवावीत यावर त्यांनी सतत शेट्टींना मार्गदर्शन केले आहे.

अलिकडेच मध्यप्रदेश येथे गोळीबारात ५ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या माध्यातून राजू शेट्टी आणि व्ही. एम. सिंह यांनी देशातील सर्व शेतकरी नेत्यांना एकत्र करण्याचा विचार केला होता. त्यासाठी त्यांनी दिल्लीमध्ये एक बैठक घेतली होती. बैठकीच्या आदल्याच दिवशी यादव यांनी शेट्टींची भेट घेतली आणि आपण आपल्या संघर्षामध्ये सोबत असल्याचे त्यांनी सांगितले.

तेव्हापासून दोघांची मैत्री आणखीनच घट्ट झाली आहे. त्याची परिणीती म्हणून गुरवारी योगेंद्र यादव राजू शेट्टींच्या नामांकणाच्या वेळी उपस्थित होते. त्यामुळे आता विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.

Last Updated : Mar 29, 2019, 2:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details