महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

यंदा आंतरराष्ट्रीय योग दिनाचा केवळ 'डिजीटल योग' - Yoga day videoblog competition

'घरी योगा आणि कुटुंबाबरोबर योगा' अशी यंदाची योग दिनाची संकल्पना आहे. या संकल्पनेप्रमाणे लोकांना ‘आंतरराष्ट्रीय योग दिनाला’ म्हणजे 21 जूनला सकाळी सात वाजता सहभागी होता येणार आहे.

Prime minister Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी

By

Published : Jun 5, 2020, 6:52 PM IST

नवी दिल्ली - कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा 'आंतरराष्ट्रीय योग दिन' हा केवळ डिजीटल माध्यमांमध्ये साजरा करण्यात येणार आहे. योग दिनानिमित्त लोकांना दरवर्षीप्रमाणे एकत्र येता येणार नाही. सरकारने व्हिडीओ ब्लॉगमधून योग दिनात सहभागी होणाऱ्यांना बक्षिसे जाहीर केली आहेत.

'घरी योगा आणि कुटुंबाबरोबर योगा' अशी यंदाची योग दिनाची संकल्पना आहे. या संकल्पनेप्रमाणे लोकांना ‘आंतरराष्ट्रीय योग दिनाला’ म्हणजे 21 जूनला सकाळी सात वाजता सहभागी होता येणार आहे.

यापूर्वी आयुष्य मंत्रालयाने लेह याठिकाणी मोठ्या प्रमाणात योगदिन साजरा करण्याचे नियोजन केले होते. मात्र कोरोनाच्या संकटामुळे हे नियोजन रद्द करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 मे रोजी ‘माय लाईफ माय योगा’ या व्हिडिओ ब्लॉगिंग स्पर्धेचे लॉन्चिंग केले आहे. त्यामधून लोकांमध्ये योगाबद्दल जनजागृती आणि योगा करण्यासाठी प्रेरणा निर्माण व्हावी हा उद्देश आहे.

या स्पर्धेतील विजेत्यांना एक लाख, 50 हजार, 25 हजार असे तीन बक्षीसे देण्यात येणार आहेत. तर विदेशातील विजेत्यांना 2,500 डॉलर 1,500 डॉलर व 1,000 डॉलर असे तीन बक्षीसे देण्यात येणार आहेत.

भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले की, या स्पर्धेमुळे जगात योगाविषयी चर्चा होणार आहे. त्याचा फायदा आरोग्याबरोबरच मानवी आयुष्याकडे पाहण्यात येणाऱ्या दृष्टिकोनाला होणार आहे.

जनतेला फेसबूक, ट्विटर अशा समाज माध्यमात योगाचे व्हिडिओ पोस्ट करून स्पर्धेत सहभागी होता येईल. त्यासाठी नागरिकांना #MyLifeMyYogaINDIA हा हॅशटॅग वापरावा लागणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details