महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मिरात फुटीरतावादी नेता यासीन मलिकला पोलिसांनी घेतले ताब्यात - श्रीनगर

यासीन मलिक हा 'काश्मीर लिबरेशन फ्रंट' या फुटीरतावादी संघटनेचा म्होरक्या आहे. पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यानंतर काही दिवसांनी जम्मू-काश्मीर सरकारने फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढून घेतली होती. यामध्ये मलिकसह सय्यद अली शाह गिलानी, शब्बीर शाह आणि सलीम गिलानी यांचा समावेश होता.

मलिक1

By

Published : Feb 23, 2019, 12:40 PM IST

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावादी नेता म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या यासीन मलिकला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसांनी ही कारवाई केली. यासीन मलिक हा 'काश्मीर लिबरेशन फ्रंट' या फुटीरतावादी संघटनेचा म्होरक्या आहे.

कोटीबाग पोलिसांनी त्याला मायासुमा येथील त्याच्या निवासस्थानातून ताब्यात घेतले. तो येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी ही कारवाई केली. राज्यघटनेतील कलम '३५-ए' बाबत सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्याविषयी त्याला ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये कलम '३५-ए' नुसार जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देण्यात आला आहे.

पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यानंतर काही दिवसांनी जम्मू-काश्मीर सरकारने फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढून घेतली होती. यामध्ये मलिकसह सय्यद अली शाह गिलानी, शब्बीर शाह आणि सलीम गिलानी यांचा समावेश होता.

ABOUT THE AUTHOR

...view details