श्रीनगर- केंद्र सरकारने फुटीरतावादी नेत्यांवरील कारवाईचा पाश आणखीन आवळण्यास सुरुवात केली आहे. जम्मू आणि काश्मीर लिब्रेशन फ्रंटचा (जेकेएलएफ) अध्यक्ष मोहम्मद यासिन मलिकला मंगळवारी दिल्लीतील तिहार तुरुंगात हलविण्यात आले आहे. तो जम्मूमधील कोट बालवालमध्ये कैदेत होता.
एअर इंडियाच्या विमानाने मलिकला मंगळवारी संध्याकाळी जम्मूहून दिल्लीत आणल्याचे सूत्राने सांगितले. मलिकवर सार्वजनिक सुरक्षितता कायदा (पीएसए) या कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. त्याला जम्मूमध्ये ७ मार्चला हलविण्यात आले होते. या कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला कायदेशीर हस्तक्षेपाशिवाय दोन वर्षापर्यंत कैदेत ठेवता येते.