वॉशिंग्टन डी. सी- जगभरामध्ये कोरोना संकट दिवसेंदिवस गहिरे होत चालले आहे. जागतिक स्तरावर कोरोना बाधितांची संख्या 20 लाखांच्या जवळ आली आहे. जगभरात एकूण कोरोनाग्रस्त 19 लाख 56 हजार 305 झाले असून एकट्या अमेरिकेत कोरोना बाधितांचा आकडा 5 लाख 91 हजारांवर पोहचला आहे. युरोपातील कोरोनाग्रस्तांची संख्या 10 लाखांच्या पुढे गेली आहे.
जगभरात कोरोनाग्रस्त 20 लाखांच्या जवळ; तर अमेरिका सहा लाखांच्या उंबरठ्यावर - corona live news
जगभरातील 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. आत्तापर्यंत विविध देशांत तब्बल 1 लाख 23 हजार नागरिक दगावले आहेत.
जगभरातील 180पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. आत्तापर्यंत विविध देशांत तब्बल 1 लाख 23 हजार नागरिक दगावले आहेत. अशा कठीण परिस्थितीतही दिलासादायक बातमी म्हणजे 4 लाख 63 हजार रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. एकूण कोरोनाबाधितांपैकी अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 13 लाख 69 हजार 06 आहे. सर्वात जास्त रुग्ण अमेरिकेत दगावले आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क आणि न्यूजर्सी राज्यामध्ये कोरोनाचा सर्वात जास्त संसर्ग फैलावला आहे.
2008साली आलेल्या जागतिक मंदीनंतर आता कोरोनामुळे पुन्हा भयंकर आर्थिक मंदी आली आहे, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेने म्हटले आहे. दरम्यान चीनने कोरोनावर दोन लसी विकसित करत क्लिनिकल ट्रायल टप्प्यापर्यंत आणण्यात यश मिळविले आहे. भारतातही 40 लसी विकासाच्या टप्प्यावर असून अंतिम लस तयार झालेली नाही. जागतिक स्तरावर सर्व संशोधक लस तयार करण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत.