महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बिहारमध्ये जगातील सर्वात मोठी मानवी साखळी; ४ कोटी २७ लाख नागरिकांचा सहभाग - बिहार मानवी साखळी

बिहार राज्यामध्ये जगातील सर्वात मोठी मानवी साखळी तयार करण्याचा विश्वविक्रम आज(रविवारी) रचला जाणार आहे. मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्या महत्त्वाकांक्षी 'जल जीवन हरियाली अभियाना'च्या जनजागृतीसाठी ही मानवी साखळी तयार केली जाणार आहे.

human chain bihar
मानवी साखळी

By

Published : Jan 19, 2020, 12:14 PM IST

पाटना - बिहार राज्यामध्ये जगातील सर्वात मोठी मानवी साखळी तयार करण्याचा विश्वविक्रम आज(रविवारी) रचला जाणार आहे. मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्या महत्त्वाकांक्षी 'जल जीवन हरियाली अभियाना'च्या जनजागृतीसाठी ही मानवी साखळी तयार केली जाणार आहे. राज्यातील तब्बल चार कोटी पेक्षाजास्त नागरिक या मानवी साखळीचा भाग बनणार आहेत. या कार्यक्रमाच्या उद्धाटनासाठी मुख्यमंत्री नितिश कुमार शहरातील गांंधी मैदानात पोहचले आहेत. तेथून साखळीची सुरवात केली जाणार आहे.

बिहारमध्ये जगातील सर्वात मोठी मानवी साखळी; ४ कोटी २७ लाख नागरिकांचा सहभाग

बिहार सरकारने बालविवाह, हुंडा बंदी, दारुबंदीसारखी उद्दिष्ये डोळ्यासमोर ठेवून जल जीवन हरियाली या अभियानाची सुरुवात केली आहे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील नागरिकांनी सहभाग घेतला आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्यामध्ये एकूण १६ हजार ३५१ किमी लांबीची मानवी साखळी बनवण्यात येणार आहे. ५ हजार ५२ किमीची साखळी महामार्गावर असेल तर ११ हजार २९९ की.मीची लांबीची साखळी उप महामार्गांची असेल.

कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे.

पाटनामधील गांधी मैदानापासून या साखळीला सुरवात होणार आहे. तेथून संपूर्ण राज्यभर नागरिक या साखळीला जोडले जाणार आहेत. मुख्यमंत्र्यासह अनेक मंत्री आणि नेते या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

साखळी तयार करण्यासाठी नद्यात बोटी जोडण्यात आल्या आहेत.

या कार्यक्रमाच्या चित्रिकरणासाठी १२ हेलिकॉप्टर आणि ३ विमानांचा वापर करण्यात येणार आहे. तसेच दुचाकींवरुनही चित्रिकरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची पाहणी करण्यासाठी गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड या संघटनेच्या सदस्यांनाही बोलावण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details