महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जगभर पसरलेला कोरोना 'साथीचा रोग', जागतिक आरोग्य संघटनेची घोषणा - कोरोना संसर्गजन्य आजार

चीनच्या वुहान राज्यातून जगभर पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे आत्तापर्यंत 4 हजारापेक्षा अधिक लोकांचा बळी घेतला आहे.

World Health Organization declares corona virus outbreak pandemic
कोरोना विषाणू महामारी म्हणून जाहीर, जागतिक आरोग्य संघटनेची घोषणा

By

Published : Mar 12, 2020, 5:03 AM IST

Updated : Mar 12, 2020, 7:25 AM IST

नवी दिल्ली - जगभरात कोरोना वेगात पसरत आहे. आत्तापर्यंत जवळपास 107 पेक्षा अधिक देशातील एक लाखापेक्षा अधिक लोकांना या विषाणूची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) कोरोना विषाणू हा साथीचा रोग असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चीनच्या वुहान राज्यातून जगभर पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे आत्तापर्यंत 4 हजारापेक्षा अधिक लोकांचा बळी घेतला आहे. यामध्ये चीन, इटली, इरान, दक्षिण कोरिया, स्पेन, फ्रान्स, अमेरिका, जपान, इराक, इंग्लंड, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, लेबनॉन, स्वित्झर्लँड, मरीनो, जर्मनी, बेल्जीयम, इंडोनेशिया, पनामा, मोराक्को, कॅनडा, फिलीपाईन्स, इजिप्त, अर्जेंटीना, थायलँड आणि तैवान यांसारख्या देशातील नागरिकांचा समावेश आहे.

हेही वाचा -कोरोनाच्या भीतीमुळे एअर इंडियाची इटली, कोरियाला जाणारी विमानसेवा रद्द

भारतातही कोरोना विषाणूचा शिरकाव झाला आहे. केरळ, हरियाणा, उत्तरप्रदेश, पंजाबनंतर आता महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ६३ हून अधिक झाली आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता देशाचे आरोग्य मंत्रालय विशेष खबरदारी घेत आहे. याचाच एक भाग म्हणून, मंत्रालयाने १५ एप्रिलपर्यंत सर्व पर्यटक व्हिसा रद्द केले आहेत.

हेही वाचा -COVID-19 : १५ एप्रिलपर्यंत सर्व पर्यटक व्हिसा रद्द; आरोग्य मंत्रालयाचा निर्णय..

यासोबतच १५ फेब्रुवारीनंतर चीन, इटली, इराण, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या देशांमधून आलेल्या सर्व नागरिकांना १४ दिवसांसाठी इतरांपासून वेगळे ठेवण्यात येणार आहे. यामध्ये परदेशी नागरिकांसोबतच भारतीयांचाही समावेश असणार आहे, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले.

Last Updated : Mar 12, 2020, 7:25 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details