महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कर्नाटक : जाणून घ्या हम्पीमधील गणेश मंदिरांचा इतिहास आणि महत्व... - hampi lord ganesha

देशात प्रसिद्ध असलेल्या काही गणेश मंदिरांमध्ये जागतिक वारसा स्थळ असलेल्या हम्पीमधील गणेश मंदिराचाही समावेश आहे. कर्नाटक राज्यातील हम्पीमधील हे गणेश मंदिर पर्यटन स्थळासह हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान आहे.

world-famous-hampi-consists-of-the-legendary-statues-of-lord-ganesha
कर्नाटक

By

Published : Aug 24, 2020, 7:02 AM IST

Updated : Aug 24, 2020, 8:12 AM IST

होसापेट (कर्नाटक) - सध्या देशभरामध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. देशात प्रसिद्ध असलेल्या काही गणेश मंदिरांमध्ये जागतिक वारसा स्थळ असलेल्या हम्पीमधील गणेश मंदिराचाही समावेश आहे. कर्नाटक राज्यातील हम्पीमधील हे गणेश मंदिर पर्यटन स्थळासह हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान आहे.

हम्पी हे भारताच्या कर्नाटक राज्यातील बेल्लारी जिल्ह्यातील एक गाव आहे. हे गाव तुंगभद्रा नदीकाठी वसले आहे. हे गाव प्राचीन हिंदू विजयनगर साम्राज्याचे राजधानीचे नगर होते. हम्पी येथील सासिवेकालू गणेश मंदिर आणि कडालेकलू गणेश मंदिर ही प्रसिद्ध आहेत. युनेस्कोद्वारे हम्पी या गावाला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. हम्पी हे शहर दगड खनिजसंपत्तीने समृद्ध आहे.

हम्पीमधील हे गणेश मंदिर पर्यटकांसाठी एक आकर्षण आहे. येथे गणेशाची मुर्ती खडकातून कोरलेली आहे. सासिवेकालू गणेश मंदिर हे कानडी भाषेतील नाव आहे. या मंदिरातील गणेशाची मुर्ती 8 फूट (2.5 मीटर) उंच असून दगडाच्या मोकळ्या मंडपात आहे. मुर्तीमधील गणेशाचे पोट हे मोहरीच्या दाण्यासारखे आहे. म्हणूनच त्याला (सासिवेकालू म्हणजे मोहरी) सासिवेकालू असे नाव देण्यात आले. इतिहासानुसार, या गणेशाची मुर्तीची उभरणी हम्पीमधील मोहरी विकून केल्याचे म्हटले जाते.

पौराणिक कथांनुसार, हम्पीला आलेल्या एका मोहरीच्या विक्रेत्याने नफा झाल्यानंतर ही गणेशाची दगडातून मुर्ती तयार केली होती. मोहरी विक्रीच्या नफ्यामधून मुर्ती उभारल्याने त्याने या मुर्तीस 'सासिवेकालू गणपा', असे नाव दिले होते. यामुर्तीमध्ये गणेशाच्या हातामध्ये हत्तीचा एक तुटलेला दात आणि अंकुश आहे. त्याचे पोट पुढे आलेले दिसत आहे. असे म्हटले जाते की, जेव्हा श्री गणेशाने जास्त अन्न खाल्ले, तेव्हा पोट फुटू नये, म्हणून गणेशाने त्यावर साप बांधला. ही मूर्ती एका खडकाला कापून बनवण्यात आलेली आहे.

सासिवेकालू गणेश मंदिरासह हम्पीमध्ये हेमकुटाच्या पायथ्याशी कडालेकलू गणेश मंदिर पहायला मिळते. एका विशाल दगडात हे मंदिर कोरलेले आहे. या गणेशाचे पोट हरभऱ्याच्या आकाराप्रमाणे दिसते. म्हणूनच, याला कडालेकलू गणेश असे नाव देण्यात आले आहे. हम्पी येथे अस्तित्त्वात असलेल्या सर्वात मोठ्या मूर्तींपैकी ही एक आहे.

कर्नाटक : जाणून घ्या हम्पीमधील गणेश मंदिरांचा इतिहास आणि महत्व...

हम्पी हे एक आनंददायी पर्यटन स्थळ आहे. येथे लेण्या, शिल्पकलेची मंदिरे, पाहायला मिळतात. कृष्ण मंदिर, बडविलिंग मंदिर, मातंग टेकडी, विरूपाक्ष मंदिर, लोटस महाल, हत्ती शाळा, विजय विठ्ठल मंदिर, दगडी रथ अशा अनेक शिल्पांचा यात समावेश आहे.

Last Updated : Aug 24, 2020, 8:12 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details