महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दहशतवादाविरोधात सर्व राष्ट्रांनी एकवटायला हवं - सय्यद अकबरुद्दीन - UN on kashmir

संयुक्त राष्ट्राच्या ७४ व्या आमसभेच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर भारताचे स्थायी सदस्य सय्यद अकबरुद्दीन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दहशतवादा विरोधात लढण्याच आवाहन त्यांनी जागतिक समुहाला केले.

सय्यद अकबरुद्दीन

By

Published : Sep 20, 2019, 1:21 PM IST

न्युयॉर्क - 'दहशतवादा विरोधात सर्व राष्ट्रांनी एकवटायला हवं. भारताचं दहशतवादामुळं मोठं नुकसान झालं आहे, त्यामुळे दहशतवाद विरोधात भारत काम करत राहील, असे भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी सदस्य सैय्यद अकबरुद्दीन यांनी सांगितले. संयुक्त राष्ट्राच्या ७४ व्या आमसभेच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

27 सप्टेंबर रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान काश्मीर मुद्द्यावरून संयुक्त राष्ट्रात भाषण देणार आहेत यावरुन त्यांनी पाकिस्तानला अप्रत्यक्षपणे टोला लगावला. जेव्हा एक देश स्वत:लाच खालच्या स्तराचा दाखवायचा प्रयत्न करील, मात्र, त्याचवेळी भारत उंच भरारी घेत असेल, असे ते म्हणाले.

दहशतवादा विरोधात लढण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी जागतिक समुहाला केलं आहे. दहशतवादा विरोधात लढण्यासाठी संयुक्त राष्ट‌्राच्या कक्षेत राहून भारत प्रयत्न करत आहे. त्यामुळे सर्व राष्ट्रांनी दहशतवादा विरोधात एकत्र यावं, असे आवाहन अकबरुद्दीन यांनी केले.

आम सभेदरम्यान मोदी आणि ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार का? असे विचारले असता, २३ आणि २५ सप्टेंबर दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. याबरोबरच बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्याशी काश्मीर किंवा रोहींग्या प्रश्नाबाबात द्विपक्षीय चर्चा होणार का? असे पत्रकारांनी विचारले. जे प्रश्न प्रकर्षाने पुढे येतील ते चर्चेला घेण्यात येतील. बांग्लादेश आणि भारतामधील विषय चर्चेने सोडवण्यात येतील, असे अकबरुद्दीन म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details