सूरत - महिलांकडून आपल्या समाजाला नेहमीच प्रेरणा मिळत आली आहे. अशाच एक महिला म्हणजे, गुजरातच्या मीना मेहता. दर महिन्याला त्या सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलींना सॅनिटरी नॅपकिन्सचे मोफत वाटप करतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'शी इन्स्पायर्स अस' या मोहिमेमध्ये मीना मेहता यांचा उल्लेख केला, आणि त्यांच्या कामाची माहिती जगासमोर मांडली. आपल्या 'मन की बात' या ट्विटर हँडलवरून पंतप्रधान मोदींनी ट्विट करत, इतर महिलांसाठी त्या प्रेरणास्त्रोत असल्याचे म्हटले.
गरीब कुटुंबातील मुली आणि महिलांना त्या मोफत सॅनिटरी नॅपकीन वाटतात. त्यासोबतच, त्यांना स्वतःच्या शारिरिक आरोग्याबाबतही जागरूक करतात. त्यांच्या या कार्यामुळे, त्यांना 'पॅड दादी' म्हणूनही ओळखले जाते. त्यांच्या या कार्यामध्ये त्यांचे पतीही त्यांना साथ देतात.