हैदराबाद- आर्थिक कारणावरून पतीशी झालेल्या भांडणानंतर एका महिलेने आपल्या २ वर्षाच्या मुलीसह इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
पतीशी भांडणानंतर २ वर्षांच्या चिमुकलीसह महिलेची चौथ्या मजल्यावरुन उडी - fight with husband
घटनेनंतर दोघींना ओमिनी रुग्णालयात जखमी अवस्थेत दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादम्यान महिलेला मृत घोषीत करण्यात आले. तर मुलीला पुढील उपचारासाठी रेनबो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महिलेची चौथ्या मजल्यावरुन उडी
पद्मजा रामा मूर्ती (वय, ३३ कुकुटपल्ली, बालाजीनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. तर अक्षरा मूर्ती (वय, २) असे जखमी मुलीचे नाव आहे. घटनेनंतर दोघींना ओमिनी रुग्णालयात जखमी अवस्थेत दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादम्यान महिलेला मृत घोषीत करण्यात आले. तर मुलीला पुढील उपचारासाठी रेनबो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी कुकुटपल्ली पोलीस ठाण्यात मृत महिलेच्या वडिलांनी पती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.