झाशी- नवाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत २२ ऑगस्टला एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. मात्र, मृत व्यक्तीच्या मुलीने शेजारी राहणाऱ्या लोकांनी वडिलांची हत्या केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी संशयित मारेकऱ्यांना अद्याप अटक न झाल्याने मृताची मुलगी पुनीत यांनी मुंडन करत निषेध व्यक्त केला आहे. जोपर्यंत वडिलांच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही, तोपर्यंत डोक्यावर केस ठेवणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
वडिलांच्या मारेकऱ्यांना अटक करा, अन्यथा रोज मुंडण करणार, मुलीने घेतली शपथ
झाशी शहरात निवृत्त अभियंत्याचा छतावरून पडून मृत्यू झाला होता. मात्र, वडिलांची हत्या झाल्याचा आरोप मृताच्या मुलीने केला आहे. जोपर्यंत वडिलांच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही, तोपर्यंत डोक्यावर केस ठेवणार नाही अशी शपथ तिने घेतली आहे.
झाशी शहरातील नवाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुंदर कॉलनी येथे २२ ऑगस्टला निवृत्त अभियंता योगेंद्र सिंह यांचा छतावरून पडून मृत्यू झाला होता. मात्र, त्यांची मुलगी पुनीत यांनी शेजाऱ्यांनी हत्या केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर नवाबाद पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या वीरेंद्र कुमार व राजीव कुमार यांच्या विरूद्ध एफआयआर दाखल करत या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. मात्र, संशयित आरोपींना अटक न झाल्याच्या निषेधार्थ पुनीत यांनी मुंडन करत आपला निषेध व्यक्त केला. तसेच अल्पसंख्याक आयोगाकडे आरोपींना लवकर अटक करावी, अशी मागणी केली आहे. जोपर्यंत वडिलांच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही, तोपर्यंत डोक्यावर केस ठेवणार नाही अशी शपथ त्यांनी घेतली आहे.
पुनीत यांच्या विनंतीनंतर अल्पसंख्याक आयोगाने झाशीच्या पोलीस अधीक्षकांना १८ सप्टेंबरला आयोगासमोर हजर राहण्यास सांगितले आहे. पुनीत यांनी शनिवारी आणि रविवारी मुंडण केले आहे. जोपर्यंत आरोपींनी अटक होत नाही, तोपर्यंत रोज मुंडण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आरोपींकडून कुटुंबाला धोका असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.