महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

धोका देणाऱ्या नवऱ्याला शिकवला चांगलाच धडा ! बायकोची प्रेयसीला सर्वांसमोर चप्पलने मारहाण - प्रगती नगर

लक्ष्मण याचा सौजन्या हिच्यासोबत विवाह झाला आहे. दोघांना २ अपत्येही झाली आहेत. परंतु, मागील काही महिन्यांपासून लक्ष्मणने अनुषा नावाच्या मुलीसोबत अनैतिक संबंध ठेवले होते.

बायकोची प्रेयसीला सर्वांसमोर चप्पलने मारहाण

By

Published : Jul 25, 2019, 11:42 PM IST

हैदराबाद - धोका देणाऱ्या नवऱ्याला बायकोने रंगेहाथ पकडले. यानंतर, संतापलेल्या बायकोने सर्वांसमोर प्रेयसीला चप्पलने मारहाण केली. तर, नवऱ्यालाही सर्वांसमोर कानाखाली मारत राग व्यक्त केला. ही घटना आज (गुरुवार) प्रगती नगर, हैदराबाद येथे घडली.

नवरा दुसऱ्या मुलीसोबत संबंध ठेवून आहे. याची कुणकुण बायकोला लागली होती. तिने याची माहिती नातेवाईकांना दिली. बायकोने आणि नातेवाईकांना नवरा प्रेयसीसोबत राहत असलेल्या प्रगती नगर भागातील फ्लॅटवर धाड टाकली. यावेळी बायकोने प्रेयसीसोबत नवऱ्याला रंगेहाथ पकडले. यानंतर, बायकोने प्रेयसीचे केस ओढले, तिला लाथाबुक्यांनी मारहाण करताना चप्पलनेही बडवले. बायकोसोबत २ नातेवाईकांनीही प्रेयसी आणि नवऱ्यावर हात धुवुन घेतले. यासोबतच नवऱ्यालाही चापटा मारल्या. हा सर्वप्रकार बायकोच्या नातेवाईकांनी कॅमेऱ्यात कैद केला.

बाचुपल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण याचा सौजन्या हिच्यासोबत विवाह झाला आहे. दोघांना २ अपत्येही झाली आहेत. परंतु, मागील काही महिन्यांपासून लक्ष्मणने अनुषा नावाच्या मुलीसोबत अनैतिक संबंध ठेवले होते. दोघेजण प्रगती नगर भागात राहत होते. मारहाणीच्या घटनेनंतर पोलिसांनी याप्रकरणी चौघांना ठाण्यात आणले. परंतु, महिलेने तक्रार दिली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details