रांची - हजारीबाग जिल्ह्यातील महिला कोरोना संकटामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. कोरोनामुळे मास्कला प्रचंड मागणी वाढली असून त्याचा पुरवठा व्यवस्थेवर ताण पडत आहे. ही बाब लक्षात घेऊन हजारीबागमधील दोन महिला बचत गटांनी मदतीचा हात पुढे केला आहे. दोन बचत गटातील महिला मास्क आणि पीपीई कीटची निर्मिती करुन जिल्हा प्रशासनाला त्याचा पुरवठा करत आहेत.
आरोग्यविभागाच्या मदतीला महिला बचत गट; पीपीई कीटचा करत आहेत पुरवठा - Self-help group
कोरोनामुळे मास्कला प्रचंड मागणी वाढली असून त्याचा पुरवठा व्यवस्थेवर ताण पडत आहे. ही बाब लक्षात घेऊन हजारीबागमधील दोन महिला बचत गटांनी मदतीचा हात पुढे केला आहे. दोन बचत गटातील महिला मास्क आणि पीपीई कीटची निर्मिती करुन जिल्हा प्रशासनाला त्याचा पुरवठा करत आहेत.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य विभागातील सर्व डॉक्टर्स आणि आरोग्य सेवक जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत. मात्र, पीपीई कीटशिवाय ते रुग्णांवर उपचार करु शकत नाहीत. सध्या देशातील परिस्थिती पाहता पीपीई कीटची अत्यंत आवश्यकता आहे. ही बाब लक्षात घेऊन हजारीबागमधील पूजा महिला बचत गट आणि कमला बचत गटातील २० महिलांनी पीपीई कीट आणि मास्क बनवायला सुरुवात केली. एक महिला दिवसभरात तीन ते चार पीपीई कीट तयार करत आहे. एका दिवसाला जवळपास १०० कीट हे दोन बचत गट तयार करतात. महिलांच्या या मदतीमुळे जिल्हा आरोग्यविभागाला मोठा आधार मिळाला आहे.
हजारीबागमध्ये पीपीई कीटची कमतरता असल्याने या महिलांकडून पीपीई कीट मिळत आहेत. १५० इतक्या माफक दरात या कीट आरोग्य विभागाला मिळत आहेत. अॅम्बुलन्स ड्रायवर, आरोग्य सेवक, वॉर्ड बॉय, सफाई कामगार याचा उपयोग करत आहेत.