महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दिल्ली : मास्क तयार करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांचा पुढाकार, दिवसाला हजार मास्कचे उदिष्ट - etv bharat

दिल्लीतील ग्रेटर कैलाश पोलीस ठाण्यात महिला कर्मचारी या दररोज १ हजार मास्क तयार करत आहेत. त्यांच्याद्वारे बनवण्यात आलेले मास्क हे पोलिसांसह इरत गरजूंमध्येही वाटप केले जात आहेत.

मास्क तयार करण्यासाठी जुटले पोलीस कर्मचारी
मास्क तयार करण्यासाठी जुटले पोलीस कर्मचारी

By

Published : Apr 15, 2020, 2:24 PM IST

नवी दिल्ली - देशातील कोरोना विषाणूशी लढण्याकरता संपूर्ण देशातील डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, आरोग्य विभाग, पोलीस दिवसरात्र एक करत आहेत. दिल्ली पोलिसांनी या दृष्टीने एक पाऊल पुढे उलचल आता मास्क तयार करणे सुरू केले आहे.

मास्क तयार करण्यासाठी जुटले पोलीस कर्मचारी

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आले. पोलीस, आरोग्य विभाग कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी कसोशिने प्रयत्न करत आहे. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उपयोगी पडणाऱ्या वस्तूंचा पुरवठा कमी पडू नये यासाठी दक्षिण पूर्व दिल्लीच्या ग्रेटर कैलाशमधील पोलीस ठाण्याच्या महिला कर्मचाऱ्यांनी मास्क तयार करण्याचे काम सुरू केले आहे. हे कर्मचारी दरदिवशी १ हजार मास्क तयार करत आहेत.

येथील कर्मचाऱ्यांकडून तयार करण्यात आलेले मास्क हे पोलिसांसह अन्य गरजवंतांनाही वाटप करण्यात येत आहे. याकरीता नियमितपणे ३ कर्मचारी कार्यरत आहेत. सोबतच, जो ठाण्यातील इतर कर्मचारीदेखील यासाठी हातभार लावत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details