मनाली -कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव हिमाचल प्रदेश येथेदेखील वेगाने पसरत चालला आहे. दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाय केले जात आहेत. तर, ग्रामीण क्षेत्रातील रहिवासी देखील आपल्या सुरक्षिततेसाठी पुढाकार घेत आहेत. मनाली गावातील महिला या गावाच्या सीमेवर पोलींसासोबत पहारा देण्याचे काम करण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. ग्राम पंचायतच्या अध्यक्षा मोनिका भारती यांनी याबाबत माहिती दिली आहे.
पोलीस प्रशासनासोबत पहारा देण्यासाठी महिलांनी घेतला पुढाकार - himachal pradesh news
मनाली गावातील महिला या गावाच्या सीमेवर पोलींसासोबत पहारा देण्याचे काम करण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. ग्राम पंचायतच्या अध्यक्षा मोनिका भारती यांनी याबाबत माहिती दिली आहे.
पोलीस प्रशासनासोबत पहारा देण्यासाठी महिलांनी घेतला पुढाकार
या महिला पोलीसांसोबत सीमेवर घराबाहेर विनाकारण पडणाऱ्यांना समजावून घरी पाठवण्याचे काम करत आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून गावातील महिलांनी हे पाऊल उचलल्याचे मोनिका यांनी सांगितले आहे.