बहराइच - उत्तर प्रदेशच्या बहराइचमधील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसूती विभागाच्या समोरच रस्त्यावर महिलेची प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना घडली. प्रसूती वेदनांनी विव्हळणाऱ्या या महिलेला कुणीही रुग्णालयात दाखल करण्याची तसदी घेतली नाही. अखेर महिलांनी रस्त्यावरच चादर लावून या महिलेची प्रसूती केली.
रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे रस्त्यावरच झाली महिलेची प्रसूती - महिला ने सड़क पर बच्चे को जन्म दिया
ही गरोदर महिला प्रसूती वेदनांनी बहराइच रुग्णालयाबाहेर विव्हळत होती. मात्र, तरीही तिला कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केले नाही. अखेर महिलांनीच पुढाकार घेऊन रस्त्यावर महिलेची प्रसूती केली.
रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे रस्त्यावरच झाली महिलेची प्रसुती
हेही वाचा -ग्राऊंड रिपोर्ट : आदिवासी समाज सीएए आणि एनआरसीच्या कसोटीवर ठरणार नापास?
या महिलेसाठी जवळच असलेल्या रुग्णालयाने स्ट्रेचरही उपलब्ध करून दिले नसल्याचा आरोप उपस्थितांनी केला. घटनेची माहिती मिळाल्यावर मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. के. सिंह यांच्या सूचनेनुसार महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणाच्या चौकशीअंती दोषींवर कारवाई होईल, असे आश्वासन सिंह यांनी दिले आहे.