शिमोगा - सध्या देशात अनेक ठिकाणी पावसाने कहर केला आहे. अनेक नद्यांना पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कर्नाटकमध्येही मुसळधार पाऊस झाल्यामुळे तुंगा नदीला पूर आला आहे. शिमोगा जिल्ह्यात तुंगा नदीच्या पाण्यात एक महिला वाहून जात असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका व्यक्तीने त्या महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यामध्ये त्याला अपयश आले.
VIDEO : कर्नाटकातील तुंगा नदीच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या महिलेला वाचविण्यात अपयश - जनजीवन विस्कळीत
सध्या देशात अनेक ठिकाणी पावसाने कहर केला आहे. अनेक नद्यांना पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कर्नाटकमध्येही मुसळधार पाऊस झाल्यामुळे तुंगा नदीला पूर आला आहे. शिमोगा जिल्ह्यात तुंगा नदीच्या पाण्यात एक महिला वाहून जात असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
तुंगा नदीच्या पाण्यात महिला गेली वाहून
कर्नाटकमधील शिमोगा जिल्ह्यातील तुंगा नदीला मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात शिमोगामधील रामण्णा श्रेष्ठी पार्कमधील महिला वाहून गेली आहे. एका व्यक्तीने त्या महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र, पाण्याचा वेग जास्त असल्याने महिलेला बाहेर काढणे त्याला शक्य झाले नाही. या सर्व घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.