बारीपादा - डॉक्टरांच्या संपामुळे ओडिशा येथे अत्यंत दुख:द घटना घडली आहे. एका महिलेने मृत जुळ्या मुलांना जन्म दिला होता. परंतु, वेळेवर उपचार न मिळाल्याने त्या महिलेचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर महिलेच्या संतप्त झालेल्या नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन केले.
दुख:द..! डॉक्टरांच्या संपामुळे महिला आणि जुळ्या बाळांचा झाला मृत्यू - पती
एका महिलेने मृत जुळ्या मुलांना जन्म दिला होता. परंतु, वेळेवर उपचार न मिळाल्याने त्या महिलेचाही मृत्यू झाला.
घटनेबाबत महिलेचा पती म्हणाला, शुक्रवारी सकाळी माझ्या पत्नीने मृत जुळ्यांना जन्म दिला होता. यानंतर काहीवेळाने तिचाही मृत्यू झाला. माझ्या पत्नीचा मृत्यू डॉक्टरांच्या संपामुळे झाला आहे. मी डॉक्टरांना उपचार करण्यासाठी विनवणी करत होतो. परंतु, माझ्या विनवणीनंतर त्यांनी ३० ते ४० हजारांची मागणी केली.
डॉक्टरांनी आरोपांबाबत नकार देताना स्पष्ट केले, की आमच्याकडे महिला आल्याबरोबरच तिच्यावर उपचार सुरू केले होते. महिलेला ११ जूनला भर्ती करण्यात आले होते. यानंतर, अल्ट्रासाउंडमध्ये महिलेला जुळे असल्याचे स्पष्ट झाले होते. परंतु, नंतर उपचार केल्यानंतर कळाले, की महिलेचा गर्भातील जुळे मृत आहेत. रुग्णांच्या मोठ्या संख्येमुळे आम्ही त्यांना वाट बघण्यास सांगितले. परंतु, महिलेचे नातेवाईक तिला घेवून गेले.