महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

खळबळजनक! हैदराबादमध्ये पुन्हा आढळला महिलेचा जळालेला मृतदेह - hyderabad burnt women news

शमशाबाद येथे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील महिलेचा मृतदेह सापडला आहे. स्थानिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी फोटो काढून पोलिसांना माहिती कळवली. यानंतर संबंधित घटना समोर आल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक कुमार गौड यांनी दिली आहे.

woman's charred body found in Hyderabad
हैदराबादमध्ये आणखी एका महिलेचा जळालेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

By

Published : Nov 29, 2019, 11:52 PM IST

Updated : Nov 30, 2019, 3:47 AM IST

हैदराबाद - पशुवैद्यकीय महिला डॉक्टरवरील सामूहिक अत्याचाराच्या घटनेनंतर पुन्हा एकदा हैदराबादच्या शांत शहर या प्रतिमेला तडा गेला आहे. सिद्दलगुत्ता रस्त्याजवळ जळालेल्या अवस्थेमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.

शमशाबाद येथे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील महिलेचा मृतदेह सापडला आहे. स्थानिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी फोटो काढून पोलिसांना माहिती कळवली. यानंतर संबंधित घटना समोर आल्याची माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त अशोक कुमार गौड यांनी दिली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत असून यानंतर अधिक माहिती समोर येईल.

हेही वाचा- पशुवैद्यकीय डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरण; ४८ तासांमध्ये आरोपी ताब्यात..

गुरुवारी (दि.28नोव्हेंबर)ला शहरालगतच्या भागात पोलिसांना एका जळालेल्या महिलेचा मृतदेह सापडला होता. चौकशी दरम्यान या महिलेचा सामूहिक बलात्कार झाल्याचे समोर आले होते.

Last Updated : Nov 30, 2019, 3:47 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details