महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दिल्लीच्या शकूर बस्ती रेल्वे स्ठानकात मुलीवर सामुहिक लैंगिक अत्याचार - शकूर बस्ती रेल्वे स्ठानक सामुहिक अत्याचार

दिल्लीमध्ये महिला आणि मुली सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. १० डिसेंबरला शकूर बस्ती रेल्वे स्थानकावर थांबलेल्या एका तरूणीवर तीन जणांनी सामुहिक लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले.

Sexual Assault
अत्याचार

By

Published : Dec 14, 2020, 11:46 AM IST

नवी दिल्ली -राजधानी दिल्लीमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यात मुली आणि महिलांसोबत होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांचे प्रमाण जास्त आहे. १० डिसेंबरला अशीच एक घटना घडली. शकूर बस्ती रेल्वे स्थानकावर थांबलेल्या एका तरूणीवर तीन जणांनी सामुहिक लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले.

शकूर बस्ती रेल्वे स्ठानकावर एका मुलीवर सामुहिक अत्याचार झाला

तरूणीवर सामुहिक अत्याचार -

पीडिता 10 डिसेंबरच्या रात्री कुटुंबीयांसोबत वाद झाल्याने घरातून निघून जाऊन शकूर बस्ती रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफार्म वर बसली होती. तिच्या वडीलांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मुलीला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र, ती सापडली नाही. दरम्यान, पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास जखमी अवस्थेत पीडिता घरी आली. तीने झालेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यांनी तत्काळ पोलिसांना याची कल्पना देत तीन आरोपींविरोधात तक्रार दिली.

आरोपी फरार -

पोलिसांनी पीडितेची प्राथमिक चौकशी करून तिला रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर मंगोलपूरीमधील संजय गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तीन आरोपी तरुणांनी पीडितेला मारहाण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिला अर्धमेल्या अवस्थेत टाकून ते फरार झाले. ज्या दिवशी ही घटना घडली त्याचा दिवशी रेल्वे स्थानकातील तीन दुकानांमध्ये चोरी झाली होती. या दोन्ही घटनांतील आरोप सारखेच असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आरोपींचा शोध सुरू -

सामुहिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या जबाबाच्या आधारे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेणे सुरू केले आहे. ज्या रेल्वे स्थानकावर ही घटना झाली, तिथे रेल्वे सुरक्षा बलाची चौकी आहे. त्याठिकाणी 24 तास जवान गस्त घालत असतात. असे असूनही सामुहिक अत्याचाराची घटना झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details