महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

धक्कादायक.. चिमुरडीसमोरच विवाहितेवर सामूहिक बलात्कार, दिले सिगरेटचे चटके व विष पाजून फेकले रस्त्यावर - Woman raped by ex-husband and his relatives

मध्य प्रदेशच्या रतलाम मध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका महिलेचे अपहरण करून, तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आले. त्यानंतर, तिच्या शरीरावर सिगरेटचे चटक् देऊन, तिला विष पाजून तिच्या पाच वर्षांच्या मुलीसह रस्त्यावर फेकून देण्यात आले. हा सर्व प्रकार होताना तिची पाच वर्षांची मुलगी तिच्या सोबतच होती. या घटनेमध्ये महिलेचा पहिला पती आणि त्याच्या चार नातेवाईकांचा हात असल्याची माहिती मिळाली आहे. तिने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे, तसेच महिला आरोपीचा शोध सुरू आहे.

Woman raped by ex-husband

By

Published : Oct 9, 2019, 11:50 AM IST

भोपाळ - मध्यप्रदेशच्या रतलाममध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका महिलेचे अपहरण करून, तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आले. त्यानंतर, तिच्या शरीरावर सिगरेटने डाग देऊन, तिला विष पाजून तिच्या पाच वर्षांच्या मुलीसह रस्त्यावर फेकून देण्यात आले. हा सर्व प्रकार होताना तिची पाच वर्षांची मुलगी तिच्या सोबतच होती.

पाच वर्षांच्या मुलीसमोरच महिलेवर सामूहिक अत्याचार; नंतर विष पाजून फेकले रस्त्यावर..

या घटनेमध्ये महिलेचा पहिला पती आणि त्याच्या चार नातेवाईकांचा हात असल्याची माहिती मिळाली आहे. आरोपींमध्ये एका महिलेचादेखील समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने आपल्या पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतला होता आणि दुसरे लग्न केले होते. महिलेच्या पहिल्या पतीने एक महिन्याआधीच तिच्या दुसऱ्या पतीला मारहाण केली होती. त्या घटनेची तक्रार देताना ही महिला मुख्य साक्षीदार होती.

या घटनेची माहिती पीडितेच्या पहिल्या पतीने आपल्या भाच्याला दिली, त्यानंतर त्या दोघांनी कट रचत महिलेचे अपहरण करून तिला शेतात नेले. त्यानंतर, आपल्या अन्य नातेवाईकांसह पीडितेच्या तिच्यावर सामूहिक अत्याचार करत, तिच्या अंगावर सिगारेटचे चटके देखील दिले. या प्रकाराची वाच्यता तिने कुठे करू नये म्हणून तिला शेतातील कीटकनाशक पाजून बाजूला रस्त्यावर फेकून दिले. सकाळी ग्रामस्थांना ती दिसून आल्यानंतर त्यांनी तिला रूग्णालयात दाखल केले. तिने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे, तसेच महिला आरोपीचा शोध सुरू आहे.

हेही वाचा : बुलडाण्यात अनैतिक संबंधातून जोडप्याची आत्महत्या?

ABOUT THE AUTHOR

...view details