बंगळुरू - कर्नाटकमधील हुबळी येथे एका महिलेची फुटपाथवरच प्रसुती झाली असून तीने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. हुबळी येथे रुग्णालायत नेत असताना प्रसव कळा असह्य झाल्यानंतर महिलेने रस्त्यावरच बाळाला जन्म दिला.
कर्नाटकमध्ये महिलेने फुटपाथवरच दिला बाळाला जन्म - Woman gives birth roadside in Hubli
कर्नाटकमधील हुबळी येथे एका महिलेची फुटपाथवरच प्रसुती झाली असून तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. प्रसुतीनंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दान कौर असे महिलेचे नाव आहे. दानला प्रसुतीसाठी हुबळी येथील रुग्णालयात घेऊन जात होते. मात्र, वेदना असह्य झाल्यानंतर रुग्णालयाच्या दिशेने जात असताना रस्त्यामध्येच तिची प्रसुती झाली. त्यानंतर दानला केआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पंजाबच्या फरिदाबाद येथील रहिवासी धर्मसिंग बाबासिंघे हे आयुर्वेद औषधांची विक्री करण्यासाठी 6 महिन्यापूर्वी हुबळी येथे आले होते. लॉकडाऊनमध्ये अडकल्यानंतर धर्मसिंग हे गर्भवती पत्नी दान कौरसह आरटीओ कार्यालयाशेजारील रस्त्यावर एका झोपडीत राहत होते. दरम्यान त्यांच्याकडे बाळाची काळजी घेण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने त्यांनी लोकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.