महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

धक्कादायक! १६व्या प्रसूतीनंतर आईसह बाळाचा मृत्यू - national breaking news

कमी वयात 16 मुलांना जन्म देणे आश्चर्यकारक आहे आणि सामाजिक देखील प्रश्न उपस्थित करते. या घटनेनंतर ग्रामीण भागात कुटुंब नियोजनाबाबत केलं जाणारं दुर्लक्ष पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

child death of baby with mother
आईसह बाळाचा मृत्यु

By

Published : Oct 12, 2020, 9:48 AM IST

भोपाळ (दमोह) - मध्य प्रदेशच्या बटियागढ जिल्ह्यातील पडझीर गावात शनिवारी प्रसूतीनंतर एका 45 वर्षाच्या महिलेने आपल्या 16व्या मुलाला जन्म दिला. यानंतर महिलेची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर तिला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच रस्त्यात बाळासह आईचा मृत्यू झाला. कमी वयात 16 मुलांना जन्म देणे आश्चर्यकारक आहे आणि सामाजिक देखील प्रश्न उपस्थित करते. या घटनेनंतर ग्रामीण भागात कुटुंब नियोजनाबाबत केलं जाणारं दुर्लक्ष पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील बाटियागड तहसील अंतर्गत पडझीर गावची रहिवासी असलेल्या महीलेने शनिवारी प्रसूतीनंतर आपल्या 16व्या मुलाला जन्म दिला. परंतु प्रसूतीदरम्यान प्रकृती चिंताजनक झाल्याने कुटुंबीयांनी तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. मात्र, दोघेही वाटेतच मरण पावले. सदर महिलेला 15 मुलं आहेत. यामध्ये 4 मुले आणि 4 मुली आहेत. बाकी 7 मुलांचा यापूर्वी मृत्यू झाला आहे. पाडाझिर गाव हे दमोह जिल्हा मुख्यालयापासून साधारण 50 किमी लांब आहे.

या संदर्भात दमोह जिल्ह्याचे मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकारी डॉ. संगीता त्रिवेदी म्हणाले, सरकारच्या इतक्या योजना असतानाही या महिलेचं कुटुंब नियोजनाअंतर्गत समावेश नसणे, ही धक्कादायक बाब आहे. या प्रकरणाचा तपास करणे आवश्यक असून दोषी असलेल्यावर कारवाई करण्याची गरज आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details