नवी दिल्ली - मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यात एका 45 वर्षीय महिलेने आपल्या 16 व्या मुलाला जन्म दिला, परंतु त्यानंतर आई आणि बाळ दोघांचाही मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (एनआरएचएम) अंतर्गत मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ते (आशा) कल्लोबाई विश्वकर्मा यांनी ही माहिती दिली.
मध्य प्रदेशमध्ये महिलेने दिला 16 व्या बाळाला जन्म; दोघांचा मृत्यू - Woman birth to 16th child
उत्तर प्रदेशच्या सुखराणी अहिरवार या महिलेने शनिवारी 16 व्या बाळाला जन्म दिला. परंतु त्यानंतर आई आणि बाळ दोघांचाही मृत्यू झाला आहे.
मध्य प्रदेश
पडझीर गाव येथील सुखराणी अहिरवार या महिलेने शनिवारी 16 व्या बाळाला जन्म दिला. या महिलेची आणि बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. तथापि, अहिरवारने यापूर्वी 15 मुलांना जन्म दिला होता, परंतु त्यातील सात जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकारी डॉ. संगीता त्रिवेदी यांनी घटनेची पुष्टी केली.