पश्चिम गोदावरी (आंध्र प्रदेश) - एका गर्भवती महिलेचा उंदीर मारण्याच्या औषधाने दात घासल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील गालायगडूम गावात घडली. मोनिका, असे मृत महिलेचे नाव आहे. या महिलेने चुकून दात घासण्याच्या पेस्टऐवजी उंदीर मारण्याचे औषध वापरले होते.
उंदीर मारण्याच्या औषधाने दात घासल्यामुळे गर्भवतीचा मृत्यू - औषध मारण्याच्या औषधामुळे मृत्यू
आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यात उंदीर मारण्याच्या औषधाने दात घासल्यामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे.
आंध्र प्रदेशच्या वेस्ट गोदावरी जिल्ह्यात उंदीर मारण्याच्या औषधाने दात घासल्यामुळे गर्भवतीचा मृत्यू
मृत मोनिका ही नऊ महिन्यांची गर्भवती होती. पाच जूनला तिने दात घासण्यासाठी उंदीर मारण्याचे औषध वापरले. त्यानंतर दोन दिवस ती ठीक होती. मात्र, अचानक तिची प्रकृती खालावल्याने तिला एलुरू येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात नेल्यानंतर तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला. दरम्यान, उपचार सुरू असतानाही प्रकृती खालावल्याने सोमवारी तिचा मृत्यू झाला.