महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उत्तर प्रदेश: महिला पोलीस उपनिरीक्षक आरजू पवारची आत्महत्या

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात एका महिला पोलीस उपनिरिक्षकाने गळफास घेवून आत्महत्या केली. पोलिसांना घरातून एक सुसाईड नोट मिळाली असून या प्रकरणी तपास सुरू आहे.

आत्महत्या
आत्महत्या

By

Published : Jan 2, 2021, 2:09 PM IST

Updated : Jan 2, 2021, 2:44 PM IST

बुलंदशहर -उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात नववर्षाच्या पहिल्याच रात्री एका महिला पोलीस उपनिरिक्षकाने गळफास घेवून आत्महत्या केली. पोलिसांना घरातून एक सुसाईड नोट मिळाली असून या प्रकरणी तपास सुरू आहे. आरजू पवार असे महिला पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून त्या भाड्याच्या घरात राहत होत्या.

पंख्याला गळफास घेवून केली आत्महत्या

महिला पोलीस उपनिरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

आरजू पवारच्या यांच्या घरातील फोनची रिंग बराच वेळ वाजत असल्याने घरमालकाने दरवाजा वाजवला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर घरमालकाने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी खिडकीच्यावरून डोकावून पाहिले असता पंख्याला गळफास आत्महत्या केल्याचे दिसले. घरामध्ये पोलिसांना एक सुसाईड नोटही आढळून आली आहे. यामध्ये त्यांनी आत्महत्येस स्वत:ला जबाबदार धरले आहे. मात्र, पोलीस आत्महत्येचा विविध अंगाने तपास करत आहेत. न्यायवैद्यक पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.

२०१५ साली झाली होती भरती

आरजू पवार बुलंदशहर जिल्ह्यातील अनूपशहर कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या. २०१५ साली त्या पोलीस दलात भरती झाल्या होत्या. मागील अडीच वर्षापासून त्यांची नेमणूक अनूपशहर पोलीस ठाण्यात झाली होती. रोज सायंकाळी सात वाजता त्या ड्यूटीवरून माघारी येत असत. मात्र, शुक्रवारी रात्री उशीरा त्यांनी ओढणीच्या साहय्याने गळफास घेतला. आरजू ही मुळची शामली जिल्ह्यातील असून तिच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.

Last Updated : Jan 2, 2021, 2:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details