महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) मध्ये नाव न आल्याने महिलेची आत्महत्या - national citizenship

आसामच्या नोगाव जिल्ह्यातील कोलिआबोर बोरघुली येथील एका महिलेने आत्महत्या केली आहे. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) यादीत नाव नसल्याने तिने आत्महत्या केली आहे.

आसाममध्ये महिलेने आत्महत्या केली

By

Published : Sep 3, 2019, 9:11 PM IST

कोलिआबोर (आसाम)- नोगाव जिल्ह्यातील कोलिआबोर बोरघुली येथील एका महिलेने आत्महत्या केली आहे. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) यादीत नाव नसल्याने तिने आत्महत्या केली आहे. ही यादी ३१ ऑगस्ट रोजी प्रकाशित झाली होती. यादीत नाव न आल्याच्या विवंचनेतून तिने हे पाऊल उचलल्याचे समजते आहे.

एनआरसीमध्ये नाव न आल्याने आसामच्या एका महिलेने केली आत्महत्या

मृत महिला व तिचा पती आपल्या पाच मुलांबरोबर गुवाहाटीला राहत होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते तिथे वास्तव्यास होते. त्यामुळे राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) प्रक्रियेदरम्यान या दाम्पत्याला आपली ओळख पटविण्यासंदर्भातील कागदपत्रे वेळेवर जमा करणे शक्य झाले नाही. त्यामुळे तिचे नाव एनआरसीमध्ये आले नाही. त्यामुळे या महिलेने आत्महत्या केल्याचे समजते आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details