महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

घरच्यांचा प्रेमाला विरोध, प्रियकराच्या घरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

उत्तर प्रदेशच्या महोबा येथे २१ वर्षीय तरुणीने प्रेमप्रकरणाला कुटुंबीयांचा विरोध असल्याच्या कारणावरून मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

By

Published : Jun 10, 2020, 5:22 PM IST

महोबा - उत्तर प्रदेशच्या महोबा येथे एका २१ वर्षीय तरुणीने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. तिचे घराशेजारी राहणाऱ्या पुरुषाशी प्रेमसंबंध होते. मात्र, तिच्या कुटुंबाचा त्यांच्या नात्यास विरोध असल्याने महिलेने आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणीचे घराशेजारी राहणाऱ्या एका माणसाबरोबर प्रेमसंबंध होते. या शेजाऱ्याचे आई-वडील हे मजूर असून ते कामानिमित्त दिल्लीला असल्याने तो घरात एकटाच राहत होता. दरम्यान, ती त्याला भेटायला जात असे. मात्र, तिच्या कुटुंबीयांच्या त्यांच्या नात्याला विरोध होता.

मंगळवारी ती त्याला भेटायला त्याच्या घरी गेली होती. याबाबत तिच्या घरच्यांना कळताच त्यांनी काही ग्रामस्थांसह सदर पुरुषाच्या घराला घेराव टाकला आणि त्याला दरवाजा उघडण्यास भाग पाडले. यावेळी त्याला घराबाहेर ओढून बेदम मारहाण करण्यात आली. दरम्यान, त्या तरुणीचा घरात लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला असे जमाव केलेल्या नागरिकांचे म्हणणे असल्याचे पोलीस सर्कल अधिकारी अवध सिंह यांनी सांगितले.

याबाबत माहिती मिळताचे पोलिसांनी घटनास्थळ गाठले. मात्र, यावेळेस पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. सदर परिस्थिती हाताळत पोलिसांनी जखमी अवस्थेत असलेल्या तरुणीच्या प्रियकराला रुग्णालयात पाठवले. तर, तरुणीने प्रियकरासोबत त्याच्या घरात सापडल्याच्या भीतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची शंका पोलिसांना आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिका तपास सुरू केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details