महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उत्तराखंड: एम्स रुग्णालयातील महिला आरोग्य कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला आयसोलेशन वार्डात दाखल करण्यात आले आहे. तसेच तिच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांचाही शोध घेतला जात आहे.

aiims rishikesh
एम्स ऋषिकेश

By

Published : May 5, 2020, 12:28 PM IST

देहराडून - उत्तराखंड राज्यातील ऋषिकेश येथील ऑल इंडिया मेडिकल इन्स्टिट्यूट(एम्स) येथील महिला आरोग्य कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. युरोलॉजी विभागात रुग्णसेवेचे काम करणाऱ्या महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा ६१ झाला आहे.

रुग्णांच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज आहे. एम्स सारख्या रुग्णालयामध्येही आरोग्य कर्मचारी कोरोनापासून सुरक्षित नाहीत. महिलेचे वैद्यकीय नमुने तपासणीसाठी पाठविले असता कोरोना चाचणी सकारात्मक आली. चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला आयसोलेशन वार्डात दाखल करण्यात आले आहे. तसेच तिच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांचाही शोध घेतला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details