पणजी - श्रीरामाला त्याच्या संपूर्ण प्रवासात बऱ्याच लोकांची मदत झाली. त्यामधील आदिवासी आणि अल्पसंख्याक समुदायातील लोकांचाही समावेश होता. अयोध्येतील राममंदिर उभारण्यासाठी जी समिती नेमली जाईल, तिने अशा लोकांच्या मूर्तींची स्थापना करण्याबाबत विचार करायला हवा, असे मत गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी व्यक्त केले.
दक्षिण गोव्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलताना मलिक म्हणाले की, अयोध्येमध्ये रामाचे भव्य मंदिर उभारले जावे, ही संपूर्ण देशाची इच्छा आहे. मात्र, रामाला त्याच्या प्रवासात ज्या लोकांनी मदत केली, त्या लोकांनाही या मंदिरात जागा मिळावी, अशी इच्छा मात्र कोणीही व्यक्त करताना दिसत नाही. श्रीराम जेव्हा लंकेला जात होते, त्यादरम्यान त्यांना अनेक आदिवासी लोकांनी आणि अल्पसंख्याक लोकांनी मदत केली. मात्र, अजूनही कोणी केवत आणि शबरी यांच्या मूर्तींसाठी मागणी करताना दिसत नाही.