नवी दिल्ली : गेल्या 24 तासांमध्ये देशात 50 हजार 129 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 78 लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी याबाबत माहिती दिली.
गेल्या 24 तासांमध्ये 50 हजार नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद; तर ६२ हजार रुग्णांना मिळाला डिस्चार्ज - भारत कोरोना रुग्णसंख्या
काल दिवसभरात एकूण 578 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 1 लाख 18 हजार 534 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 78 लाख 64 हजार 811 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 6 लाख 68 हजार 154 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.

यासोबतच, काल दिवसभरात एकूण 578 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 1 लाख 18 हजार 534 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 78 लाख 64 हजार 811 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 6 लाख 68 हजार 154 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत 70 लाख 78 हजार 123 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.
तसेच, काल दिवसभरात 11 लाख 40 हजार 905 कोरोना चाचण्या पार पडल्या. यानंतर देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या 10 कोटी, 25 लाख, 23 हजार, 469 एवढी झाली आहे.