महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गेल्या २४ तासांमध्ये ४३ हजार नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद; तर ५८ हजार रुग्णांना डिस्चार्ज

काल दिवसभरात एकूण 508 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 1 लाख 20 हजार 10 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 79 लाख 90 हजार 322 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 6 लाख 10 हजार 803 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत.

With 43,893 new #COVID19 infections, India's total cases surge to 79,90,322
गेल्या २४ तासांमध्ये ४३ हजार नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद; तर ५८ हजार रुग्णांना डिस्चार्ज

By

Published : Oct 28, 2020, 10:03 AM IST

नवी दिल्ली :गेल्या 24 तासांमध्ये देशात 43 हजार 893 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 79 लाख 90 हजारांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी याबाबत माहिती दिली.

यासोबतच, काल दिवसभरात एकूण 508 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 1 लाख 20 हजार 10 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 79 लाख 90 हजार 322 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 6 लाख 10 हजार 803 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत 72 लाख 59 हजार 509 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

तसेच, काल दिवसभरात 10 लाख 66 हजार 786 कोरोना चाचण्या पार पडल्या. यानंतर देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या 10 कोटी, 54 लाख, 87 हजार, 680 एवढी झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details