नवी दिल्ली -सोमवारपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. 13 डिसंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. जम्मू, काश्मीरमधील स्थिती, आर्थिक मंदी, बेकारी, प्रस्तावित नागरिकत्व विधेयक आदी विषयांवरून हे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा... शिवसेना एनडीएतून बाहेर, संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशींनी केले जाहीर
महत्वाच्या विधेयकांवर चर्चा होण्याची अपेक्षा
हिवाळी अधिवेशन १३ डिसेंबपर्यंत चालणार आहे. त्यादरम्यान दोन्ही सभागृहांमध्ये२७ विधेयके मंजुरीसाठी मांडली जाणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात २८ विधेयके मंजूर करण्यात आली होती. त्यात जम्मू-काश्मीरचे विभाजन आणि विशेष अधिकार रद्द करणारे विधेयक आदी विधेयकांचा समावेश होता.
हेही वाचा... अयोध्या प्रकरण : मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड दाखल करणार पुनर्विचार याचिका
मांडली जाणारी महत्त्वाची विधेयके : व्यक्तिगत माहिती संरक्षण, तृतीयपंथीयांचे हक्कव संरक्षण, इलेक्ट्रिक सिगरेट प्रतिबंध, औद्योगिक क्षेत्राशी निगडित संहिता, कर दुरुस्ती विधेयक, कंपनी दुरुस्ती विधेयक, चिट फंड दुरुस्ती विधेयक, राष्ट्रीय वैद्यकीय आयोग, सरोगसी नियंत्रण विधेयक, जालियनवाला बाग राष्ट्रीय स्मारक दुरुस्ती विधेयक.
हेही वाचा... राजू शेट्टींनी घेतली शरद पवारांची भेट
तसेच या अधिवेशनात प्रामुख्याने देशासमोरील आर्थिक संकट, शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढती बेरोजगारी, काश्मीरमधील ‘नाकाबंदी’ तसेच, नागरिकत्व दुरुस्ती विधेयक अशा अनेक मुद्द्यांवर विरोधक सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे, तर विरोधकांनी उपस्थित केलेल्या सर्व राष्ट्रीय मुद्द्यांवर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सविस्तर चर्चा केली जाईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सर्वपक्षीय बैठकीत दिले.