नवी दिल्ली - भारताच्या इतिहासात प्रथमच हवाई सेनेच्या फ्लाईंग युनिटमध्ये महिला फ्लाईट कमांडर असणार आहे. हवाई दलातील विंग कमांडर 'एस. धामी'ने देशातील पहिली महिला फ्लाईट कमांडर होण्याचा मान मिळवला आहे. हिंडन या हवाई तळावरील 'चेतक हेलिकॉप्टर' युनिटचे फ्लाईट कमांडरपद ती सांभाळणार आहे.
'एस. धामी' बनली भारतीय हवाई दलाची पहिली महिला फ्लाईट कमांडर - first female Flight Commander
भारताच्या इतिहासात प्रथमच हवाई सेनेच्या फ्लाईंग युनिटमध्ये महिला फ्लाईट कमांडर असणार आहे. हवाई दलातील विंग कमांडर 'एस. धामी'ने देशातील पहिली महिला फ्लाईट कमांडर होण्याचा मान मिळवला आहे.
!['एस. धामी' बनली भारतीय हवाई दलाची पहिली महिला फ्लाईट कमांडर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4261350-thumbnail-3x2-dhaani.jpg)
Wing Commander S Dhami
सर्व क्षेत्रांप्रमाणेच संरक्षण क्षेत्रातही महिलांचे योगदान हे पुरूषांच्या बरोबरीने होत आहे. आजची महिला ही केवळ स्वतःचेच नाही तर देशाचेही रक्षण समर्थपणे करू शकते, हेच धामीसारख्या महिला दाखवून देत आहेत.