नवी दिल्ली - भारतीय हवाईदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान श्रीनगरमधील त्यांच्या पथकात (स्क्वॉड्रन) परतणार आहेत. सध्या वर्धमान हे ४ आठवड्यांच्या वैद्यकीय रजेवर आहेत. मात्र, विश्रांतीची गरज असतानाही चेन्नई येथील आपल्या घरी न जाता त्यांनी श्रीनगरला जाण्याचा निर्णय घेतला आहे.
विंग कमांडर अभिनंदन वर्धमान वैद्यकीय रजेत श्रीनगरमध्ये जाणार
भारतीय हवाईदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान श्रीनगरमधील त्यांच्या पथकात (स्क्वॉड्रन) परतणार आहेत. सध्या वर्धमान हे ४ आठवड्यांच्या वैद्यकीय रजेवर आहेत. मात्र, विश्रांतीची गरज असतानाही चेन्नई येथील आपल्या घरी न जाता त्यांनी श्रीनगरला जाण्याचा निर्णय घेतला आहे.
रिसर्च अॅन्ड रेफरल रुग्णालयात त्यांनी काही दिवसांपूर्वी उपचार घेतले होते. डॉक्टरांनी त्यांना ४ आठवड्यांच्या वैद्यकीय रजेवर जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्यांनी श्रीनगरमधील पथकात (स्क्वॉड्रन) परतण्याचा निर्णय घेतला आहे. सिक लिव्हमध्ये (वैद्यकीय रजा) वर्धमान यांच्याकडे चेन्नईत जाऊन घरी विश्रांती घेण्याचा पर्याय उपलब्ध होता. मात्र त्यांनी श्रीनगरमध्ये परतण्याच्या निर्णय घेतला, अशी माहिती वायुदलाच्या सूत्रांनी दिली.
भारतीय हद्दीत घुसखोरी केलेले पाकिस्तानचे F-16 लढाऊ विमान पाडल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन यांचे मिग-२१ क्रॅश (२७ फ्रेबुवारी) झाले होते. त्यानंतर पॅराशूटच्या मदतीने ते पाकिस्तानच्या हद्दीत उतरले. यानंतर पाकिस्तानी सैन्याने त्यांना ताब्यात घेतले होते. पाकिस्तानने १ मार्चला अभिनंदन यांना भारताकडे सुपूर्द केले होते. नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानचे जेट F-16 विमान पाडताना भारताचे मिग २१ हे विमान पाकिस्तानच्या हद्दीत पडले होते. त्यानंतर जखमी अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या तावडीत सापडले होते.