पणजी -नव्याने कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने गोवा सरकार ख्रिस्ती बिशपांना चर्च उशिरा खुले करण्याची विनंती करणार आहे. याबाबतची माहिती गोव्याचे बंदर विभाग मंत्री मिशेल लोबो यांनी दिली. 8 जूनपासून धार्मिक स्थळे सरू होऊ शकतात, अशी नोटीस केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केली आहे, तरीही गोवा सरकार सावध पावले उचलत आहे.
गोव्यातील चर्च उशिरा खुले करण्याची विनंती सरकार आर्चबिशपांना करणार - गोवा कोरोना बातमी
गोव्यात जून महिन्यात हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार उघडणार नसल्याचे गोवा सरकारने आधीच जाहीर केले आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन राज्य सरकार आणखी कडक निर्बंध लादू शकते, अशी माहितीही लोबो यांनी दिली.
मागील दोन महिन्यांपासून जास्त काळ असलेल्या लॉकडाऊनमधून बाहेर पडण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने सुरू केली आहे. 'आर्चबिशप फिलिप नेरी फेरेरो यांना चर्च उशिरा खुले करण्याची विनंती करणार असल्याचे लोबो यांनी सांगितले.
स्वातंत्र्यापूर्वी पोर्तुगिजांची वसाहत असलेल्या गोव्यात 100 पेक्षा जास्त जुनी चर्च आहेत. मंगळवारपर्यंत आणखी सहा कोरोनाचे नवे रुग्ण राज्यात आढळून आल्याने प्रशासनाने रुग्ण सापडलेल्या परिसरात चाचण्यांचे प्रमाण वाढवले आहे. गोव्यात जून महिन्यात हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार उघडणार नसल्याचे गोवा सरकारने आधीच जाहीर केले आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन राज्य सरकार आणखी कडक निर्बंध लादू शकते, अशी माहितीही लोबो यांनी दिली.