नवी दिल्ली - बालाकोट येथील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या हवाई दलांमध्ये चकमक झाली होती. त्यावेळी भारताचे एम १७ हेलिकॉप्टर भारताच्याच क्षेपणास्त्राचे लक्ष्य बनले होते. याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे नवनियुक्त एअर चीफ मार्शल आर. के. एस भदोरिया यांनी सांगितले.
पुलवामा हल्ल्यानंतर भारताच्या हवाई दलाने बालाकोट येथील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होता. त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता. दोन्ही देशांच्या एअर फोर्सने एकमेकांच्या हवाई हद्दींचे उल्लंघन केले होते. त्यावेळी झालेल्या चकमकीत भारताच्याच क्षेपणास्त्राने एम-१७ हेलिकॉप्टर पाडले होते. १७ फेब्रुवारीला श्रीनगरमध्ये हेलिकॉप्टर कोसळले होते. त्यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला होता.