जयपूर -मी कोणत्याही पदाची लालसा कधी बाळगली नाही. राजस्थानच्या जनतेशी माझे अतूट नाते आहे. मी पक्षातील कोणत्याही पदावर असलो किंवा नसलो तरी राजस्थानच्या जनतेसाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करेन, असा विश्वास राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी व्यक्त केले आहे. पायलट यांनी काल (मंगळवारी) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेनंतर राज्यातील जवळपास एक महिन्यापासून चाललेल्या राजकीय पेचप्रसंगात 'दोस्तानाचा ठराव' असल्याचे संकेत दिले आहे. 14 ऑगस्टपासून राजस्थान विधानसभेचे महत्त्वपूर्ण विधानसभा अधिवेशन सुरू होत आहे. यापूर्वी 'ईटीव्ही भारत'ने सचिन पायलट यांच्याशी खास चर्चा केली.
'शेवटच्या श्वासापर्यंत राजस्थानच्या जनतेची सेवा करणार'
पायलट यांनी सर्वाधिक काळ तब्बल सहा वर्ष राजस्थान काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले आहे. ते म्हणाले, मी कोणत्याही पदाची लालसा केली नाही. ज्या लोकांनी सहा वर्षाच्या कार्यकाळात सहकार्य केले त्या लोकांसाठी काम करत राहील. राजस्थानातील लोकांशी माझे अतूट नाते आहे. मी पक्षात पद असो किंवा नसलो तरी शेवटच्या श्वासापर्यंत मी त्यांच्यासाठी काम करीन, असेही ते यावेळी म्हणाले.

राजस्थानमधील बंडखोर आमदार आणि त्यांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन त्यांनी समाधान व्यक्त केले. मी उपस्थित केलेले प्रश्न लवकरच समिती मार्गी लावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.