महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बहुमत चाचणीत उपस्थित राहणार नाही, कर्नाटकच्या बंडखोर आमदारांचा व्हिडिओ प्रसारित

कर्नाटकच्या तीन बंडखोर आमदारांनी बहुमत चाचणीत उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ प्रसारित केला आहे.

कर्नाटकच्या बंडखोर आमदारांचा व्हीडीओ

By

Published : Jul 18, 2019, 12:59 PM IST

मुंबई- कर्नाटकचे राजकीय भविष्य हे बंडखोर आमदारांवर अवलंबून आहे. परंतु, हे आमदार राजीनाम्यावर ठाम असल्याचे दिसत आहे. गुरुवारी सकाळी या बंडखोर आमदारांपैकी 3 आमदारांनी एक व्हिडिओ प्रसारित केला. आज होणाऱ्या बहुमत चाचणीत उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे. या व्हिडिओमध्ये बंडखोर आमदार एस. टी सोमशेखर, बैरती बसवाराजू आणि मुन्नी रत्ना दिसत आहेत.

बुधवारी रामलिंगा रेड्डी यांनी राजीनामा परत घेण्याचे तसेच बहुमत चाचणीत उपस्थित राहणार असल्याचे सांगितले होते. त्यावर बोलताना या आमदारांनी सांगितले की, आम्ही रामलिंगा यांच्याशी सहमत नाही, आम्ही राजीनाम्यावर ठाम आहोत.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कर्नाटकातील राजकीय नाट्यावर आज (गुरुवारी) पडदा पडण्याची शक्यता आहे. काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकार आज विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जात आहे. १५ आमदारांच्या राजीनामा नाट्यानंतर कुमारस्वामी सरकारची नाव बुडणार की, तरणार हे आज विश्वासदर्शक ठरावानंतरच स्पष्ट होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details