बंगळुरू- कर्नाटकमधील पूरपरिस्थितीमुळे लोकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. अनेक लोक बेघर झाले असल्याने त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. सरकार पूरग्रस्तांना मदत करती असली तरी ही मदत अपुरी आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नामी शक्क्ल लढवली आहे. जी कंपनी पूरग्रस्त गावाच्या पुनर्वसनासाठी 10 कोटींची मदत करेल, त्या गावाला त्या कंपनीचे नाव देण्यात येईल, असा निर्णय येडियुरप्पा यांनी घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
पूरग्रस्त गावाला 10 कोटींची मदत करणाऱ्यांचे नाव गावाला देणार; येडियुरप्पांची घोषणा - will give name to village
कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नामी शक्क्ल लढवली आहे. जी कंपनी पूरग्रस्त गावाच्या पुनर्वसनासाठी 10 कोटींची मदत करेल, त्या गावाला त्या कंपनीचे नाव देण्यात येईल, असा निर्णय येडियुरप्पा यांनी घेतला आहे.

बी. एस. येडियुरप्पा
महाराष्ट्रासोबत कर्नाटकलाही पुराचा मोठा फटका बसला आहे. कर्नाटकातील 22 जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले असून लोकांना आपले घर सोडावे लागले आहे. तसेच 200 गावांना पुरामुळे दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे. लोकांना जीवनावश्यक सुविधा पुरवून त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे बनले आहे. अशावेळी सरकारला मदतीची गरज असून त्यातून मार्ग काढण्यासाठी येडियुरप्पा यांनी ही शक्कल लढवली आहे. याच संदर्भात येडियुरप्पा यांनी देशभरातील 60 उद्योजकांची बंगळुरुमध्ये भेट घेतली होती.