महाराष्ट्र

maharashtra

रिक्षा वाहतूक सुरू करण्यास परवानगी द्या; रिक्षा चालकांची दिल्ली सरकारकडे मागणी

By

Published : May 18, 2020, 3:57 PM IST

आम्ही किती दिवस काम न करता दिवस काढायचे? दिल्ली सरकारने आम्हाला रिक्षा सुरू करण्यास परवानगी द्यावी, आम्ही सर्व सूचनांचे पालन करु. रिक्षात फक्त एकच प्रवासी बसवू,असे सुनील कुमार यादव या रिक्षाचालकाने म्हटले आहे.

delhi govt  allow three-wheelers
दिल्ली रिक्षा वाहतूक सुरु करण्याची मागणी

नवी दिल्ली-केंद्र सरकारने प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना परवानगी देण्यासंबधी निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारांना दिले आहेत. सोमवारी दिल्लीतील काही रिक्षाचालकांनी रिक्षा वाहतूक सुरू करण्यास परवानगी देण्याची विनंती केली. मांडवाली भागातील रिक्षा चालकांनी सरकारकडे परवानगी मागताना सरकारच्या सर्व सूचनांचे पालन करु, असे म्हटले आहे.

आम्ही किती दिवस काम न करता दिवस काढायचे? दिल्ली सरकारने आम्हाला रिक्षा सुरू करण्यास परवानगी द्यावी आम्ही सर्व सूचनांचे पालन करु, रिक्षात फक्त एकच प्रवासी बसवू,असे सुनील कुमार यादव या रिक्षाचालकाने म्हटले आहे. सर्व प्रवासी वाहतूक बंद असल्याने रिक्षामध्ये फार गर्दी होणार नाही आम्ही एकाच प्रवाशाला रिक्षामध्ये बसवू, असे रिक्षाचालक म्हणाला आहे.

दिल्ली सरकारने रिक्षामध्ये दोन प्रवासी घेऊन वाहतूक सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती मोहम्मद नफीस याने केली आहे. काही वेळा दोन व्यक्तींचे कुटुंब असल्यास एका व्यक्तीला सोडून प्रवास करणे अशक्य असल्याचे नफीस याने म्हटले आहे. आमचा चरितार्थ चालवण्यासाठी रिक्षा वाहतूक सुरू करण्यास सरकारने परवानगी द्यावी, असे नफीस म्हणाला आहे.

घरमालक घराच्या भाड्यासाठी तगादा लावत आहेत. 24 मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे घरभाडे देणे शक्य होत नाही, असे काही रिक्षाचालक म्हणाले. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील काही रिक्षाचालक लॉकडाऊन होण्यापूर्वीच गावी परतले असल्याचे रिक्षचालकांनी सांगितले.

दिल्ली सरकारचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल केंद्र सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊन 4.0 च्यासंदर्भात अटी जाहीर करण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details