महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मोदीजी, एकवेळ मरण पत्करेन, पण तुमच्या आई-वडिलांचा अपमान करणार नाही - राहुल गांधी

'मी आरएसएस किंवा भाजपचा माणूस नाही. मी काँग्रेसचा आहे. मोदींनी माझा कितीही द्वेष केला तरी, मी त्यांना द्वेषाने नाही, तर प्रेमानेच उत्तर देईन आणि गळाभेट घेत प्रेमानेच हरवेन,' असे राहुल यांनी म्हटले आहे.

नरेंद्र मोदी, राहुल गांधी

By

Published : May 15, 2019, 8:19 AM IST

उज्जैन - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेते सध्या विविध ठिकाणी सभांमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीसह गांधी कुटुंबीयांवर हल्ले चढवत आहेत. एकाच परिवाराचे राजकारण आणि राजीव गांधी, इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळातील भ्रष्टाचार याला विरोधकांकडून लक्ष्य करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी 'मोदीजी, मी एकवेळ मरण पत्करेन पण, तुमच्या आई-वडिलांचा अपमान करणार नाही,' असा टोला लगावला आहे. ते मध्य प्रदेशात एका सभेत बोलत होते.


'मोदीजी सतत द्वेषापोटी भाषणे करत आहेत. ते माझ्या आई-वडिलांचा आणि आजी-आजोबांचा अपमान करत आहेत. मात्र, मी एकवेळ मरण पत्करेन, पण तुमच्या आई-वडिलांचा अपमान करणार नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 'मी आरएसएस किंवा भाजपचा माणूस नाही. मी काँग्रेसचा आहे. मोदींनी माझा कितीही द्वेष केला, तरी मी त्यांना द्वेषाने नाही तर प्रेमानेच उत्तर देईन आणि गळाभेट घेत प्रेमानेच पराभूत करेन,' असे राहुल यांनी म्हटले आहे.


यापूर्वी राहुल गांधी यांनी मोदीजी पावसामुळे लढाऊ विमाने रडारवरून गायब होतात का? असा प्रश्न विचारत खिल्ली उडवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ मे रोजी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत, एअर स्ट्राईकच्या आधी ढगाळ वातावरण असल्याने हल्ल्याची तारीख बदलण्याच्या विचारात तज्ज्ञ होते. मात्र भारतीय विमानांना रडारपासून वाचण्यासाठी, अशा वातावरणाचा फायदा होऊ शकतो, असा सल्ला दिल्याचे मोदींनी म्हटले होते. यानंतर ते सोशल मीडियावरही ट्रोल झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details