लखनऊ - विविध राज्यांमध्ये अडकलेल्या उत्तरप्रदेशच्या सर्व स्थलांतरित कामगारांना माघारी आणण्याचे योगी आश्वासन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहे. स्थलांतरित कामगारांची यादी मागविण्यात येत आहे. आत्तापर्यंत ३७ रेल्वे गाड्यांतून ३० हजार नागरिकांना राज्यात माघारी आणल्याची माहितीही त्यांनी दिली.
याशिवाय बसद्वारे ३० हजार नागरिकांना राज्यात माघारी आणण्यात आले आहे. मात्र, उत्तर प्रदेशातली लाखो कामगार विविध राज्यांमध्ये अडकून पडले आहेत. त्या सर्वांना राज्यात माघारी आणले जाईल, असे आश्वासन योगी आदित्यनाथ यांनी अडकून पडलेल्या नागरिकांना दिले आहे.