जैसलमेर - सांक्रा भागातील माधोपुरा गावात पत्नीने पतीचा खून केल्याच्या प्रकार समोर आला आहे. आरोपीची पत्नी, तिचा प्रियकर आणि त्याची आई या कटात सामील होते. विशेष म्हणजे रविवारी हे प्रकरण उघडकीस आले. या संदर्भात मृत कौशल राम यांच्या नातेवाईकांनी सांकरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
झोपेच्या गोळ्या देऊन पत्नीने केला पतीचा खून, राजस्थानच्या पोखरणमधील घटना - pokhran crime news
जैसलमेरच्या पोखरणमध्ये एका पत्नीने प्रेमसंबंधांमुळे आपल्या पतीला झोपेच्या गोळ्या खायला घातल्या. यानंतर त्याच्यावर दगडांनी वार केले. त्यानंतर पतीचा गळा दाबून खून केला. याप्रकरणी पोलिसांनी मृताची पत्नी आणि प्रियकराला अटक केली आहे. चौकशीदरम्यान पत्नीने गुन्हा कबूल केला आहे.
जैसलमेरच्या पोकरणमध्ये एका पत्नीने पतीचा खून केला
मृताच्या वडिलांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित पत्नीला अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला. रविवारी सकाळी कौशलारामचे कुटुंब जागे झाले, तेव्हा त्यांना कौशलाराम यांचा मृतदेह पलंगावर पडलेला आढळला. अशा परिस्थितीत त्याच्या कुटुंबियांना पत्नीबद्दल शंका होती. याप्रकरणी पत्नीवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलीस अधीक्षक डॉ. अजय सिंह यांनी चौकशी केली आणि आरोपी पत्नीवर खुनाचा गुन्हा दाखल केला.