दिल्ली- कोरोना संक्रमणाच्या घडामोडींमध्ये उत्तर दिल्लीच्या शास्त्रीनगरमध्ये एका वेगळ्याच प्रकाराची चर्चा आहे. पत्नी आपल्या पतीला भेटण्यासाठी त्याच्या घरासमोर धरणे देवून बसली आहे. पतीला आपल्यासोबत भेटू दिले जात नसल्याचा पत्नीचा आरोप आहे.
पतीला शोधण्यासाठी सासरी पत्नीचे धरणे, पोलिसांनी दखल न घेतल्याचा आरोप - wife agitation for husban delhi
आपल्या पतीला सासरच्या लोकांनी गायब केले असल्याच्या पत्नीचा आरोप आहे. पतीला शोधण्यासाठी ती धरणे देवून नवऱ्याच्या घरासमोर बसली आहे.
कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण असताना गेल्या चार दिवसांपासून ही महिला पतीच्या घरासमोर धरणे देऊन बसत आहे. संध्या, असे या महिलेचे नाव आहे. 18 डिसेंबर 2019 रोजी पवनसोबत तिचे तेथील आर्य समाज मंदिरात लग्न झाले. आपल्या भावाचे लग्न झाल्यानंतर तुला घरी घेऊन जाईन, असे आश्वासन पवनने तिला दिले होते. त्यानंतर 14 मे रोजी पवन संध्याला त्याच्या घरी घेऊन गेला. मात्र, त्याच्या आईने भांडण करत दोघांनाही घराबाहेर काढले. त्यानंतर संध्या तिच्या घरी गेली आणि पवन दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या घरी गेला. मात्र, त्यानंतर पवनचा काहीच पत्ता लागत नाही. तो कुठे आहे, हे संध्याला जाणूण घ्यायचे आहे. मात्र, त्यांची भेट होऊ दिली जात नाही. त्यामुळे या प्रकाराला वैतागून संध्या चार दिवसांपासून पवनच्या घरासमोर धरणे देऊन बसली आहे. घरच्या लोकांनी पवनला गायब केल्याचा तिचा आरोप आहे. पोलिसांनाही हा प्रकार सांगितला. मात्र, ते याकडे दुर्लक्ष करत असून एका ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात फेऱ्या मारायला लावत असल्याचे तिचे म्हणणे आहे.